Ad will apear here
Next
वन्यजीव छायाचित्रांचे तीन दिवस प्रदर्शन
रिवा, कल्ला-मोहल्ला यांच्यातर्फे आयोजन

पुणे : ‘रिवा, कल्ला-मोहल्ला आणि अॅडव्हेंचर मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने युवा छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या २५ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेसमोरील रिवा बिल्डिंगच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन रोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे,’ अशी माहिती ‘रिवा स्टाईल’चे माधव गोडबोले, मानस गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना ‘रिवा स्टाईल’चे माधव गोडबोले, मानस गोडबोले यांच्यासह   प्रतीक जोशी, विराज सिंग, ईशान बिदये, मंदार मोटे.

‘या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी, २५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी साडेदहा वाजता वनाधिकारी रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते  होणार आहे. प्रतीक जोशी, विराज सिंग, ईशान बिदये, मंदार मोटे या युवा वन्यजीव छायाचित्रकारांनी ही छायाचित्रे टिपलेली आहेत. या चारही छायाचित्रकारांनी काढलेली जवळपास तीसपेक्षा अधिक छायाचित्रे येथे पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तनय गुमास्ते या चित्रकाराने रेखाटलेली चित्रेही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत,’ असेही गोडबोले यांनी या वेळी सांगितले. 


प्रतीक जोशी पर्यावरणशास्त्राचा विद्यार्थी असून, गेल्या सहा वर्षांपासून तो वन्यजीवांशी संबंधित काम करत आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्याने वन्यजीवांवर संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम केले आहेत. विराज सिंग यानेही पर्यावरणशास्त्राचे शिक्षण घेतले असून, निसर्ग, पक्षी यांच्याशी तो गेल्या चार वर्षांपासून जवळीक साधून आहे. जंगलातील आश्चर्यकारक क्षण त्याच्या कॅमेरातून पाहायला मिळणार आहेत.


वन्यजीव आणि छायाचित्रण याचे वेड असलेल्या ईशान बिदये यानेही पर्यावरणशास्त्रात शिक्षण घेतले आहे. पंधरा वर्षांचा असल्यापासून तो काकांच्या मदतीने वन्यजीवांचा जवळून अभ्यास करत आहे. मंदार मोटे पक्षी आणि प्राण्यांची छायाचित्रे काढण्याचा छंद असलेला युवक आहे. गेल्या आठ वर्षांपासून प्राण्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न तो करत आहे. तनय गुमास्तेदेखील वन्यजीव आणि पक्षीनिरीक्षण करणारा युवक आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZLABW
Similar Posts
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
फोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान पुणे : हौसेला मोल नसते, असे म्हणतात; पण या हौसेला सामाजिक जाणीवेचे भान दिले, तर त्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. पुण्यातील ध्रुव फडके याने हौसेखातर जोपासलेल्या फोटोग्राफीच्या छंदाला सामाजिक जबाबदारीची जोड दिली आहे. त्याने त्याच्या फोटोंचे प्रदर्शन भरवले असून, त्यातून मिळणारे उत्पन्न रत्नागिरीतील
२२ ऑगस्टपासून पुण्यात वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सव पुणे : ‘ नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ ते २५ ऑगस्टदरम्यान वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती संयोजक अनुज खरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
विखे-पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले राज्यांचे चित्ररथ पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त विखे-पाटील मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक चित्ररथांनी सर्वांची मने जिंकून घेतली. गेल्या वर्षीपासून शाळेने वेगवेगळ्या राज्यांची माहिती देणारे चित्ररथ बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदा आसाम, गुजरात, पंजाब आणि कर्नाटक या चार राज्यांचे चित्ररथ साकारण्यात आले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language